पत्नीच्या एक्सवर भडकला ‘हा’ अभिनेता, संताप व्यक्त करत म्हणाला, जे संपले ते…
अभिनेत्री रुबीना दिलैक हिने एक मोठा काळ मालिकांमध्ये गाजवला आहे. हेच नाही तर रुबीना दिलैक हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते. रुबीना दिलैक ही मोठ्या संपत्तीची मालक आहे. रुबीना दिलैक ही बिग बाॅस विजेता देखील आहे.

रुबीना दिलैक हे नाव कायमच चर्चेत असणारे आहे. काही वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर रुबीना दिलैक आणि अभिनव शुक्ला यांनी लग्न केले. आता नुकताच रुबीनाच्या एक्सवर भडताना अभिनव शुक्ला दिसलाय.

अभिनव शुक्ला याला डेट करण्याच्या अगोदर रुबीना दिलैक ही अविनाश सचदेव याला डेट करत होती. अविनाश सचदेव आणि रुबीना दिलैक यांचे 2013 मध्ये ब्रेकअप झाले.

नुकताच दिलेल्या मुलाखतीमध्ये अविनाश सचदेव हा रुबीना दिलैक हिच्याबद्दल म्हणाला की, रुबीना दिलैक ही एक पजेसिव्ह आणि इनसिक्योर गर्लफ्रेंड होती.

आता अविनाश सचदेव याचे हे बोलणे अभिनव शुक्ला याला अजिबातच आवडले नाहीये. अभिनव शुक्ला म्हणाला की, जेंव्हा रिलेशन संपते त्यावेळी ते संपलेलेच असते.

मर्द व्हा, त्या मुलीबद्दल बोलू नका, भूतकाळातील कोणत्याही गोष्टीबद्दल बोलू नका, कारण ते मदत करणार नाही. जे संपले ते संपलेच. अविनाश सचदेवचा क्लासच अभिनवने लावला.