
अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा बऱ्याच काळापासून रिलेशनशिपमध्ये आहेत. मात्र काही दिवसांपूर्वी या दोघांमध्ये ब्रेकअपच्या चर्चेला उधाण आलं होतं. या चर्चेमुळे त्यांच्या चाहत्यांमध्येही नाराजी पसरली होती.

दरम्यान, ब्रेकअपच्या चर्चेनंतर अर्जुन कपूरने स्वत: मलायकासोबत फोटो शेअर करुन ती चर्चा चुकीची आणि अफवा असल्याचं सांगितलं होतं.

अर्जुन कपूर काही दिवसांपूर्वी कोरोना पॉझिटिव्ह आला होता. कोरोनामुक्त झाल्यानंतर रविवारी हे दोघे एकसाथ लंचला गेले होते.

यावेळी अर्जुन कपूरने निळ्या रंगाची हुडी घातली होती. तसंच तो यावेळी कूल अंदाजात पाहायला मिळाला. कोरोना पॉझिटिव्ह आल्यानं अर्जुन आणि मलायकाची काही दिवसांपासून भेट झाली नव्हती.

तर मलायका यावेळी व्हाईट रंगाच्या ड्रेसमध्ये पाहायला मिळाली. यावेळी ती खूप हॉट दिसत होती.

दरम्यान, आता या दोघांचे चाहते ब्रेकअपची चर्चा घडवून आणणाऱ्यांवर टीका करत आहेत. ते लोक कुठे आहेत जे ब्रेकअपची चर्चा करत होते. तर दोघे एकमेंकांसोबत छान दिसत आहेत आणि ही जोडी कायम राहो, अशा सदिच्छाही व्यक्त करत आहेत.