
धडक फेम बॉलिवूड अभिनेता ईशान खट्टरचा आज 26 वा वाढदिवस आहे.


ईशाननं बॉलिवूडमध्ये खूप कमी काळात स्वत:ची ओळख निर्माण केली. यासाठी त्याला प्रचंड मेहनतही घ्यावी लागली.

विशेष म्हणजे त्यानं स्वत:च्या बॉडीसाठी प्रचंड मेहनत घेतली आहे. त्यानं केलेलं बॉडी ट्रान्सफॉर्मेशनसाठी अनेक जण त्याचे फार कौतुक करतात.

ईशान खट्टरनं बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी अभिनय क्षेत्रासह बॉडीवर शेप देण्यास भर दिला आहे.

जीम फ्रिक असलेला ईशान त्याच्या वर्कआऊट सेशनच्या अनेक झलक सोशल मीडियावरुन चाहत्यांना देतो. त्याचे हे व्हिडीओ व्हायरलही होतात.

ईशान हा अभिनेता शाहिद कपूरचा लहान भाऊ आहे. 2005 मध्ये ईशाननं शाहिदसोबत ‘वाह लाइफ हो तो ऐसी’या चित्रपटात काम केलं होतं.