
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत शाहिदने सांगितले की, बऱ्याच वेळा असं होतं की तो त्याची आई, नीलिमा अझीमशी बोलणे बंद करतो. मात्र, यामागचे कारणही अभिनेत्याने अगदी मोकळेपणाने सांगितले. (Photos : Instagram)

शाहिद आणि नीलिमा या दोघांमध्ये खूप घट्ट नाते आहे. शाहिद म्हणाला- तुम्हा सर्वांना माहित आहे की माझी आई नीलिमा सिंगल पॅरेंट आहे. तिने इशानला एकट्याने वाढवले आहे. "आम्ही दोघेही तिचे हे ऋण कधीच फेडू शकत नाही. तिने आमच्यासाठी जे केले त्याची परतफेड आम्ही कधीही करू शकत नाही. आई नेहमीच खूप सकारात्मक आणि प्रेमळ व्यक्ती राहिली आहे. तिने आम्हा दोन्ही भावांना खूप साथ दिली आहे."

"आई जेव्हा फोनवर किंवा समोरही माझी स्तुती करते आणि चांगल्या गोष्टी सांगते तेव्हा मी तिला सांगतो की आता मी काही दिवस तुझ्याशी बोलणार नाही. तू फक्त स्तुती करत असतेस, कधीतरी टीकाही करत जा."

" तू नेहमी माझी स्तुती केलीस, कधीच टीका केली नाहीस, तर माझे पाय जमिनीवर कसे राहतील. मी बिघडून जाईन. पण मला माझ्या मनात हे देखील माहित आहे की आईला माझ्यासाठी फक्त सर्वोत्तम हवे आहे, म्हणूनच ती खूप प्रशंसा करते.

शाहीदला त्याचे आई, वडील किंवा कुटुंबाबद्दल जास्त बोलायला आवडत नाही, कारण या गोष्टी त्याच्यासाठी थोड्या खाजगी आहेत. शाहिदने 2003 मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. हॉलिवूडमध्ये काम करण्याची इच्छा असल्याचे शाहिदने सांगितले. पण एखादा चांगला प्रोजेक्ट ऑफर झाला तरच तो ते काम स्वीकारेल, असेही त्याने स्पष्ट केले.