थलापती विजय म्हणजे नादच खुळा, बँकेत पाण्यासारखा पैसा, आकडा वाचून थक्क व्हाल!

दरम्यान, थलापती विजय लवकरच मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर विराजमान होणार आहेत. त्याआधी त्यांच्या संपत्तीची आता देशभरात चर्चा होत आहे. त्यांच्या टीव्हीके या पक्षाने तब्बल 108 जागांवर विजय मिळवला असून आता लवकरच त्यांच्या पक्षाचे सरकार स्थापन होणार आहे.

| Updated on: May 06, 2026 | 3:15 PM
1 / 5
तामिळाडूच्या विधानसभा निवडणुकीत मोठा विजय मिळाल्याने अभिनेता आणि राजकारणी थलापती विजय सध्या देशभरात चर्चेत आहे. त्यांच्या टीव्हीके या पक्षाने तब्बल 108 जागांवर विजय मिळवला असून आता लवकरच त्यांच्या पक्षाचे सरकार स्थापन होणार आहे.

तामिळाडूच्या विधानसभा निवडणुकीत मोठा विजय मिळाल्याने अभिनेता आणि राजकारणी थलापती विजय सध्या देशभरात चर्चेत आहे. त्यांच्या टीव्हीके या पक्षाने तब्बल 108 जागांवर विजय मिळवला असून आता लवकरच त्यांच्या पक्षाचे सरकार स्थापन होणार आहे.

2 / 5

दरम्यान, थलापती विजय लवकरच मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर विराजमान होणार आहेत. त्याआधी त्यांच्या संपत्तीची आता देशभरात चर्चा होत आहे. थलापती विजय यांच्याकडे फक्त बँकांमध्ये तब्बल 320 कोटी रुपये आहेत. यातील एकाच सेव्हिंग बँक अकाऊंटमध्ये 213 कोटींपेक्षा जास्त रुपये रुपये आहेत.

3 / 5

थलापती विजय यांनी मुदत ठेवीच्या रुपात तब्बल 100 कोटी रुपये बँकेत ठेवलेले आहेत. थलापती विजय यांनी दाखल केलेल्या शपथपत्रानुसार विजय यांच्या स्थावर आणि जंगम मालमत्तेचे एकूण मूल्य 624 रुपये आहे.

4 / 5

थलापती विजय यांच्याकडे असलेल्या जंगम संपत्तीचे मूल्य 404 कोटी रुपये आहे. तर स्थावर मालमत्तेचे मूल्य एकूण 220 कोटी रुपये आहे. 2024-25 मध्ये त्यांची कमवलेले पैसे तब्बल 184 कोटी रुपये आहे.

5 / 5

2024-25 सालच्या त्यांच्या कमाईचा स्त्रोत भाड्यापासून मिळालेले पैसे, व्याज हा आहे. त्यांच्या कमाईचे फक्त किंवा दोन स्त्रोत नाहीत. वेगवेगळ्या माध्यमातून त्यांनी हे पैसे कमवलेले आहेत. लवकरच ते मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us