
56 वर्षीय अभिनेता मिलिंद सोमण आजही आपल्या फिटनेसमुळे चर्चेत असतो. या वयातही मिलिंद सोमण फिटनेसच्या बाबतीत अनेक दिग्गजांशी स्पर्धा करतो. तसेच्या त्याच्या फिटनेसचे अनेक चाहते आहेत. मात्र आणखी एका कारणामुळे मिलिंद सोमण चर्चेत असतात ते म्हणजे त्यांचे लग्न होय. मिलिंद सोमण आणि त्यांची पत्नी अंकिता कोंवर यांचे नाते कायमच चर्चेचा विषय असते.

मिलिंद आणि अंकिताने 22 एप्रिल 2018 रोजी लग्नगाठ बांधली. मात्र लग्नाच्या वेळी दोघांच्या वयामध्ये असलेले अंतर चर्चेचा विषय ठरला होता. आतापर्यंत त्यांच्या लग्नापासून ते त्यांच्या नात्याबद्दल अनेक गोष्टी बोलल्या आणि ऐकल्या गेल्या आहेत . आज या जोडप्याच्या लग्नाचा चौथा वाढदिवस आहे.

अंकिता कोंवर आणि मिलिंद सोमण एका नाईट क्लबमध्ये भेटले. पहिल्या भेटीतच मिलिंद अंकिताच्या प्रेमात पडले. पुढे त्या दोघांमध्येचांगली मैत्री झाली. याच दरम्यान अंकिताच्या पहिल्या बॉयफ्रेंडचा अचानक मृत्यू झाला. याचा मोठा धक्का अंकिताला बसला होता. यातून बाहेर पडण्यास मिलिंदनेच अंकिताला मदत . केली. अंकिताच्या कठीण काळात मिलिंद कायम तिच्यासोबत राहिले

पुढे त्यांच्यातील भेटी-गाठी वाढल्या. मिलिंद व अंकिता यांच्यातील मैत्री आणखीनच घट होत गेली. एक दिवशी मिलिंदने अंकिताला धाडस करून आपल्या प्रेमाविषयी सांगितले व तिला लग्नाची मागणी घातली. अंकितानेही या प्रेमाचा स्वीकार केला. तेव्हापासून ते दोघे एकमेकांना डेट करू लागले .

अंकिता व मिलिंदने तब्बल 5 वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला. २०१८ मध्ये त्या दोघांनी लग्न केले. मात्र त्यावेळी अंकिता व मिलिंदच्या वयामध्ये तब्बल 25 वर्षाचे अंतर असल्याने त्यांना सामाजिक ट्रोलिंगाचा सामना करावा लागला. मात्र दोघांनीही याला न जुमानता अलिबाग येथे मराठी परंपरेनुसार लग्न केले. त्यानंतर जूनमध्ये स्पेनमधील चर्चमध्ये ख्रिश्चन पद्धतीनं विवाह केला.

लग्नानंतरही मिलिंद व अंकिता कायम आपले रोमँटिक फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. एकत्रितपणे फिटनेसच्या टिप्सही ते आपल्या चाहत्यांना देताना दिसतात.