
सध्या सर्वत्र मोठ्या धूमधडाक्यात नवरात्रोत्सव साजरा केला जात आहे. अनेकजण नवरात्रीचे नऊ रंग घालून उत्साहात सण साजरा करत आहेत. काही कलाकार देखील नवरात्रीच्या नऊ रंगाचे कपडे घालून फोटोशूट करतात. एका मराठमोळ्या अभिनेत्रीच्या फोटोशूटची चर्चा रंगली आहे.

एका मराठमोळ्या अभिनेत्रीने नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी, निळ्या रंगाचे कपडे परिधान करुन न्यूड फोटोशूट केले आहे. हे फोटोशूट पाहून नेटकऱ्यांनी अभिनेत्रीला चांगलेच सुनावले आहे. आता ही अभिनेत्री कोण आहे? चला जाणून घेऊया...

'सुंदरा मनामध्ये भरली' या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत दिसणाऱ्या लतिका म्हणेजच अक्षया नाईकने न्यूड फोटोशूट केले आहे. तिने निळ्या रंगाची साडी हटके पद्धतीने नेसली आहे.

अक्षयाने या न्यूड फोंटोच्या माध्यमातून सिनेमातील यमुना या भूमिकेला ट्रिब्युट दिलं आहे.

अक्षयाने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर हे न्यूड फोटो शेअर करत, 'यमुनेचा न्यूड मधला प्रवास हा केवळ कलेसाठी पोझ देण्याबद्दल नाही. तर तो तिच्या शरीरावर, तिच्या निवडींवर आणि तिच्या सन्मानावर पुन्हा हक्क सांगण्याच्या धाडसाबद्दल आहे.'

पुढे अक्षयाने, 'रवी जाधव सरांच्या न्यूड सिनेमातील यमुनाने ही शिकवण दिली की धैर्य कधीच आवज करत नाही. शांत आणि लवचिक असतं. त्यामुळे अनेकदा त्याबद्दल गैरसमज होतात. तिची ही कहाणी आपल्याला आठवण करुन देते की कधीकधी स्त्रीने धाडसी निर्णय घेणे गरजेचे असते. हा निर्णय म्हणजे जगाने समजून नाही घेतले तरीही सन्मानाने जगणे' या आशयाचे कॅप्शन दिले आहे.

सध्या सोशल मीडियावर अक्षयाच्या या फोटोंची चर्चा रंगली आहे. अनेकांनी तिच्या या धाडसाला सलाम करत पाठिंबा दिला आहे तर काहींनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. एका यूजरने थेट 'तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती तेपण नवरात्रीमध्ये'असे म्हटले आहे.