
‘विवाह’ चित्रपटातून चर्चेत आलेली अभिनेत्री अमृता राव लवकरच ‘आई’ होणार आहे.

मुंबईतील एका क्लिनिकबाहेर पती अनमोलसह ‘बेबी बंप’ फ्लाँट करताना दिसली.

अमृता आणि अभिनवने 7 वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर 2016मध्ये विवाह केला होता.

एका छोटेखानी खासगी सोहळ्यात त्यांनी लग्न केले. यात दोघांचे नातेवाईक आणि काही जवळचे मित्रमैत्रिणी सामील झाले होते.

अमृता रावचा पती अनमोल एक प्रसिद्ध रेडीओ जॉकी आहे.

अमृताने या आनंदाच्या बातमीला खासगी ठेवणेच पसंत केले होते. मात्र, माध्यमांच्या नजरेत आल्याने तिचे गोड गुपित उघड झाले आहे.