
जागतिक वसुंधरा दिनाचे औचित्य साधत बॉलीवूड अभिनेत्री दिया मिर्झा , प्रज्ञा यादव , अभिनेता मनीष पॉल मुंबईतील बीच स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले होते.

आज 22 एप्रिलला सर्वत्र जागतिक वसुंधरा दिन साजरा केला जातो. या निमित्तानं पर्यावरणप्रेमींकडून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. मुंबईमध्येही कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

बॉलीवूड कलाकार दिया मिर्जा , प्रज्ञा यादव , अभिनेता मनीष पॉल यांनी मुबईतील कार्टर रोड परिसरातील समुद्रकिनाऱ्यावरील कचरा साफ केला.

यावेळी त्यांनाही ओला-सुक्या कचऱ्याचे वर्गीकरण करता , कचरा गोळा केला. या कलाकारांच्या बरोबर इतर नागरिकही स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले होते.

अभिनेत्री दिया मिर्झाने याबाबत इंस्टाग्रामवर स्वच्छता करतानाचे फोटो टाकता सर्वांचे अभिनंदनही केले आहे. हॅशटॅग बीट द प्लास्टिक पोल्युशन असेही म्हटले आहे