अप्सरा आली.., लाल रंगाच्या साडीमधील या अभिनेत्रीचं सौंदर्य पाहून चाहते घायाळ, कोण आहे ती?
‘लक्ष्मी निवास’मधील जान्हवीचा लाल रंगाच्या साडीमध्ये पारंपरिक लूक. अभिनेत्रीची प्रत्येक पोज चाहत्यांना करतेय घायाळ. सौंदर्य पाहून अनेकजण करत आहेत कौतुक.

‘लक्ष्मी निवास’ मालिका सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. या मालिकेत अभिनेत्री दिव्या पुगावकर ‘जान्हवी’ ही भूमिका साकारत असून, तिच्या अभिनयासोबतच तिच्या लूकचीही सोशल मीडियावर चर्चा होत असते.
‘लक्ष्मी निवास’मधील जान्हवी ही श्रीनिवास आणि लक्ष्मी यांची धाकटी मुलगी आहे. दिव्याने आपल्या अभिनयातून या व्यक्तिरेखेला खास रंग दिला आहे. काही दिवसांपूर्वी या मालिकेने 600 भागांचा महत्त्वपूर्ण टप्पा पूर्ण केला.
त्यानिमित्ताने कलाकार आणि चाहत्यांमध्येही उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. दरम्यान, दिव्याने नुकतेच तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर ‘उत्सव गणरायाचा’ या कार्यक्रमातील काही खास फोटो शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये दिव्याचा पारंपरिक आणि देखणा लूक चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे. दिव्याने या खास कार्यक्रमासाठी गडद लाल रंगाची सुंदर सिल्क साडी नेसली होती.
या साडीवर तिने मंगळसूत्र, नथ, गळ्यातील हार, कानातले आणि बांगड्या असा पारंपरिक दागिन्यांचा साज केला आहे. तिच्या या मराठमोळ्या अंदाजामुळे तिच्या सौंदर्यात आणखी भर पडली आहे.