
बाॅलिवूड अभिनेता इमरान हाश्मी हा त्याच्या रोमांन्ससाठी चर्चेत असतो. इमरान हाश्मी याची सोशल मीडियावर जबरदस्त फॅन फाॅलोइंग बघायला मिळते. गीता बसरा हिने दोन चित्रपटात उमरान हाश्मीसोबत रोमांन्स केलाय.

आता गीता बसरा ही चित्रपटांपासून दूर असून कुटुंबामध्ये व्यस्त आहे. गीता बसरा हिने भारतीय क्रिकेटर हरभजन सिंह याच्यासोबत लग्न केले. हेच नाही तर यांना एक मुलगा आणि मुलगी देखील आहे.

गीता बसराने अनेक हिट चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका केल्या आहेत. लग्न झाल्यापासून ती चित्रपटापासून दूर आहे. मात्र, असे असतानाही गीता बसरा ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय दिसते.

द ट्रेन या चित्रपटात गीता बसरा ही इमरान हाश्मी याच्यासोबत रोमांन्स करताना दिसली. 2004 मध्ये गीता बसरा मुंबईत आली आणि तिला 2006 मध्ये चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली.

गीता बसराचा जन्म इंग्लंडमध्ये झाला असून तिचे शिक्षण हे यूकेमध्ये झाले. चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी गीता बसरा ही मुंबईत दाखल झाली होती.