
टीव्ही अभिनेत्री हिमांशी पाराशर ही सध्या चांगलीच चर्चेत आलीये. हिमांशी पाराशर हिच्यावर काही दिवसांपूर्वी गंभीर आरोप लावण्यात आले.

हिमांशी पाराशर आणि करण मेहरा यांचे अफेअर सुरू असल्याचे सांगितले जाते. हिमांशी पाराशर हिच्यामुळेच करण मेहराचा घटस्फोट झाल्याचा आरोप केला जातो.

आता यावर बोलताना हिमांशी पाराशर दिसलीये. हिमांशी पाराशर म्हणाली की, माझ्या आणि करणच्या अफेअरची चर्चा सुरू होती. ज्यानंतर मी स्वत:च हैराण होते.

एकेदिवशी थेट माझे आणि करणचे नाव जोडले गेले. ज्यानंतर मला धक्काच बसला. परंतू माझे आणि करण मेहराचे कधीच असे काही नव्हते.

अफेअरची चर्चा सुरू असताना करण मेहरा याने माझी माफी मागितली. आम्ही फक्त सहकलाकार आहोत. बाकी आमच्यामध्ये काहीच नाहीये.