
अभिनेत्री ईशा मालवीय आणि समर्थ जुरेल गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत दिसत आहेत. दोघेही बिग बाॅसच्या घरात सहभागी झाले होते. यावेळी अनेकदा थेट टीव्हीवर दोघे रोमांस करताना दिसले.

गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चा आहे की, समर्थ आणि ईशा यांचे ब्रेकअप झाले. आता यावर समर्थ जुरेलच्या मॅनेजरने मोठा खुलासा केलाय.

समर्थ जुरेल आणि ईशा यांचे ब्रेकअप झाले आहे. यामुळे यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसल्याचे बघायला मिळतंय. ईशा अवघ्या 19 वर्षांची आहे.

हेच नाही तर बिग बाॅसच्या घरात ईशा मालवीय हिचा एक्स देखील सहभागी झाला होता. यावेळी दोघांमध्ये जोरदार वाद बघायला मिळाले.

ईशा मालवीय आणि समर्थ यांचा बिग बाॅसच्या घरात अनेकदा रोमांस बघायला मिळाला. ज्यानंतर यांच्यावर जोरदार टीका देखील झाली.