
बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉय सध्या तिच्या सोशल मीडियावर खूप अॅक्टिव आहे आणि ती तिचे नवनवीन फोटो चाहत्यांसाठी शेअर करतेय. नुकतंच तिनं तिचे काही खास फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

तिनं शेअर केलेल्या या फोटोमध्ये ती कमालीची सुंदर दिसतेय.

या फोटोमध्ये मौनी सूर्यास्ताचा आनंद घेताना दिसतेय.

मौनीनं या फोटोमध्ये गुलाबी रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. या फोटोमध्ये ती कमालीची सुंदर दिसतेय.

तिचे हे फोटो तिच्या चाहत्यांच्या चांगलेच पसंतीस उतरत आहेत.

या फोटोला तिनं सुंदर कॅप्शनही दिलं आहे. यामध्ये तिनं लिहिलं की, ‘तुम्ही पृथ्वीवर तेवढंच प्रेम करायला हवं जेवढं तुम्ही स्वत:वर करता’.

मौनीला इन्स्टाग्रामवर 1.5 कोटींपेक्षा जास्त लोक फॉलो करतात.

मौनीचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.