
मौनी रॉय हिने अगदी कमी कालावधीमध्ये बाॅलिवूडमध्ये एक खास ओळख ही नक्कीच निर्माण केलीये. मौनी रॉय हिने आपल्या करिअरची सुरूवात ही टीव्ही मालिकांपासून केलीये.

एकता कपूर हिने पहिल्यांदा मौनी रॉय हिला संधी दिली. एकता कपूर हिच्या नागिन मालिकेत मुख्य भूमिकेत मौनी रॉय ही होती. मौनी रॉय हिने आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे.

नुकताच मुंबईमध्ये मौनी रॉय हिच्या मालकीच्या रेस्टॉरंटचे ओपनिंग झाले आहे. मुंबईच्या अंधेरी भागामध्ये मौनी रॉय हिने बदमाश नावाचे रेस्टॉरंट सुरू केले आहे. ज्याचे ओपनिंग झाले.

मौनी रॉय हिने आपल्या रेस्टॉरंटच्या ओपनिंगचे काही खास फोटो हे सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये मौनी रॉय ही पती सूरज नांबियार याच्यासोबत दिसत आहे.

मौनी रॉय हिच्या रेस्टॉरंटच्या ओपनिंगला अनेक स्टारने हजेरी लावली आहे. मौनी रॉय हिने शेअर केलेल्या फोटोमध्ये खाण्याचे आस्वाद रेस्टॉरंटमध्ये घेताना देखील मौनी रॉय ही दिसत आहे.