या अभिनेत्रीने 20 वर्षे मोठ्या अभिनेत्यासोबत केलेला रोमान्स, तिच्यावर झालेले डबल मिनिंगचे आरोप

टीव्ही इंडस्ट्रीमधील सर्वात प्रसिद्ध अभिनेत्रीने तिच्या पेक्षा 20 वर्षे मोठ्या असणाऱ्या अभिनेत्यासोबत केलेला रोमान्स. डबल मिनिंगचे झालेले आरोप.

| Updated on: Apr 30, 2026 | 6:02 PM
1 / 5
टीव्ही इंडस्ट्रीमध्ये अनेक अभिनेत्री अशा आहेत, ज्यांनी स्वतःपेक्षा वयाने मोठ्या अभिनेत्यांसोबत स्क्रीनवर रोमान्स केला आहे. आज आपण अशाच एका अभिनेत्रीबद्दल जाणून घेणार आहोत. जिने तिच्यापेक्षा 20 वर्षांनी मोठ्या अभिनेत्यासोबत रोमान्स केला.

टीव्ही इंडस्ट्रीमध्ये अनेक अभिनेत्री अशा आहेत, ज्यांनी स्वतःपेक्षा वयाने मोठ्या अभिनेत्यांसोबत स्क्रीनवर रोमान्स केला आहे. आज आपण अशाच एका अभिनेत्रीबद्दल जाणून घेणार आहोत. जिने तिच्यापेक्षा 20 वर्षांनी मोठ्या अभिनेत्यासोबत रोमान्स केला.

2 / 5

नेहा पेंडसेने एका लोकप्रिय मालिकेत स्वतःपेक्षा तब्बल 20 वर्षांनी मोठ्या अभिनेत्यासोबत पती-पत्नीची भूमिका साकारली होती. ही मालिका म्हणजे Bhabiji Ghar Par Hain!. या शोमध्ये तिने ‘अनीता भाभी’ ही भूमिका साकारत प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. तिच्या ऑनस्क्रीन पतीची भूमिका आसिफ शेखने साकारली होती.

3 / 5

या मालिकेवर अनेकदा डबल मिनिंग डायलॉग्स आणि कथानकामुळे ‘वल्गर’ असल्याचे आरोप झाले. मात्र, या वादांमुळे शोची लोकप्रियता अजिबात कमी झाली नाही. उलट, Bhabiji Ghar Par Hain मालिका सतत चर्चेत राहिली.

4 / 5

माहितीनुसार, एका प्रसंगी नेहा पेंडसेने आपल्या ऑनस्क्रीन पती आसिफ शेखसोबत डान्स करण्यास नकार दिला होता. या घटनेमुळे सेटवर मोठा गोंधळ उडाला आणि ही बाब माध्यमांमध्येही चर्चेचा विषय ठरली.

5 / 5

असेही म्हटले जाते की, ‘अनीता भाभी’ ही भूमिका साकारताना नेहा पेंडसे पूर्णपणे समाधानी नव्हती. शोच्या स्क्रिप्टमुळे तिचे निर्मात्यांसोबत अनेकदा मतभेद झाले. वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाल्यास, नेहा सध्या 41 वर्षांची आहे तर आशिफ शेख हा सुमारे 61 वर्षांचा आहे. त्यामुळे त्यांच्या वयात सुमारे 20 वर्षांचा फरक आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us