
काही दिवस यांचे वैवाहिक आयुष्य चांगले सुरू होते. मात्र, 2021 मध्ये यांच्यातील वाद वाढला. हेच नाही तर थेट यांचा घटस्फोट झाला.

अभिनेत्री निशा रावल ही हिने अभिनय क्षेत्रामध्ये मोठा काळ गाजवला आहे. निशा रावल हिने ऐ रिश्ता क्या कहलाता है अभिनेता नैतिक ऊर्फ करण मेहरा याच्यासोबत लग्न केले.

निशा रावल हिने करण मेहरावर अत्यंत गंभीर आरोप केले. आता नुकताच निशा रावल हिने मोठा खुलासा केलाय. निशा रावल म्हणाली की, घटस्फोटानंतर लोक माझ्याकडे वेगळ्या नजरेने बघत आहेत.

घटस्फोटानंतर माझे जवळचे मित्र मैत्रीण माझ्यापासून दूर गेले. वादामुळे माझ्या हातातील कामही निघून गेले. माझ्याकडे काहीच नव्हते.

काहीही झाले तरीही मला खंबीर व्हायचे होते. कारण माझ्यावर माझ्या मुलाची जबाबदारी होती, असेही निशा रावल हिने म्हटले. निशा रावल ही सोशल मीडियावरही सक्रिय असते.