
अभिनेत्री पूजा सावंत सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अॅक्टिव्ह असते.

ती नेहमीच तिचे ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. आता तिनं एक नवं फोटोशूट केलं आहे.

काळ्या रंगाच्या या ड्रेसमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे. महत्वाचं म्हणजे या काळ्या ड्रेसवर तिचा हा हेअर बेल्ट मस्त दिसतोय.

पूजा सध्या 'महाराष्ट्राज् बेस्ट डान्सर'या डान्स शोमध्ये जजची भूमिका साकारत आहे. या शो दरम्यान पूजाचं हे ग्लॅमरस लूक पाहायला मिळतंय.

‘दगडी चाळ’, ‘लापाछपी’, ‘बोनस’, ‘क्षणभर विश्रांती’ असे सुपरहिट चित्रपट पूजानं दिले आहेत. त्यामुळे तिचा चाहता वर्गसुद्धा मोठा आहे.