
बॉलिवूडची प्रसिद्ध आयटम गर्ल राखी सावंत सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतेय. अशा परिस्थितीत तिचे काही फोटो समोर आले आहेत. या फोटोंमध्ये राखी रस्त्यावर मीडियासमोर रडताना दिसली आहे. मात्र यावेळी राखीच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू होते. कारण तिच्या आईचं ऑपरेशन यशस्वी झालंय.

राखी सावंत बर्याच दिवसांपासून आईच्या उपचारामुळे नाराज होती. तर तिच्या आईच्या उपचारासाठी सलमान खाननं मदत केली. तर काल मुंबईत हे ऑपरेशन झालंय आणि ते यशस्वी झालं.

राखीनं तिच्या आईला भेट दिली आणि तिनं सलमान खानविषयी बर्याच गोष्टीदेखील सांगितल्या. तर यावेळी राखी आईला म्हणाली की पुढच्या आयुष्यात तुला सलमान खानची बहीण व्हायचं आहे आणि त्यांच्या कुटुंबाची सेवा करायची आहे.

राखीने जमिनीवर लोटांगण घालत सलमान आणि सोहेल खानचे आभार मानले.

गेले अनेक दिवस राखी तिच्या आईला या त्रासातून मुक्त करण्यासाठी धावपळ करत होती.