रेवती लेलेचा पहिला मंगळागौरीचा साज, पारंपरिक नऊवारीतील सुंदर लूकने वेधले चाहत्यांचे लक्ष
मराठी अभिनेत्री रेवती लेलेने तिचा पहिला मंगळागौरीचा व्रत मोठ्या उत्साहात साजरा केला आहे. यासाठी तिने पारंपरिक लूक केला असून तिच्या नऊवारी साडीची सध्या चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा रंगली आहे.

श्रावण महिन्यात नवविवाहित महिलांसाठी मंगळागौरीच्या व्रताला विशेष महत्त्व असते. अनेक नवविवाहित महिला मोठ्या श्रद्धेने आणि उत्साहाने मंगळागौरीची पूजा करताना दिसतात.

मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री रेवती लेले हिनेही यंदा तिचे पहिले मंगळागौरीचे व्रत मोठ्या उत्साहात साजरे केले. मंगळागौरीच्या विशेष पूजेसाठी रेवतीने पारंपरिक जांभळ्या रंगाची नऊवारी साडी नेसली होती. त्यावर लाल रंगाचा शालू घेत तिने आपला पारंपरिक लूक पूर्ण केला.

या फोटोत तिने साडीला साजेसे सोन्याचे दागिने, गळ्यातील चोकर आणि मोत्यांची नथ परिधान केली आहे. यामुळे तिच्या रूपाला खास पारंपरिक उठाव मिळाला आहे.

हातात हिरवा चुडा, पाटल्या-बांगड्या आणि बोटातील नाजूक अंगठी असा दागिन्यांचा साज आणि केसांचा अंबाडा बांधून त्यावर पिवळ्या फुलांची वेणी लावल्याने तिच्या सौंदर्यात आणखी भर पडली आहे.

मंगळागौरीच्या पूजेदरम्यानचे आणि फोटोशूटचे काही खास क्षण रेवतीने चाहत्यांसोबत शेअर केले. या फोटोंमध्ये तिच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि प्रसन्नता स्पष्टपणे दिसून येत आहे. चाहत्यांनीही तिच्या लूकचे भरभरून कमेंट्सचा वर्षाव केला आहे.