‘लालबागच्या राजा’च्या चरणी रुचिरा जाधव नतमस्तक, पारंपारिक लुकने वेधलं सर्वांचं लक्ष
रुचिरा जाधवने घेतले लालबागच्या राजाचे दर्शन; जांभळ्या पैठणीतील अभिनेत्रीच्या पारंपरिक लूकने वेधले चाहत्यांचे लक्ष, फोटोंची रंगलीय प्रचंड चर्चा.
1 / 5

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री रुचिरा जाधव हिने गणेशोत्सवानिमित्त मुंबईतील प्रसिद्ध लालबागचा राजा आणि गणेश गल्लीतील मुंबईचा राजा यांचे भक्तिभावाने दर्शन घेतले.
2 / 5
या खास दर्शनाचे काही सुंदर फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले असून, तिच्या पारंपरिक लूकची सध्या चर्चा रंगली आहे.
3 / 5
गणेशोत्सवाच्या पवित्र पर्वात रुचिराने बाप्पाच्या चरणी नतमस्तक होत आशीर्वाद घेतले. यावेळी तिने जांभळ्या रंगाची पारंपरिक पैठणी साडी नेसली होती.
4 / 5
त्यासोबत पारंपरिक दागिने, कपाळावर लाल टिळा आणि चेहऱ्यावर सुंदर हास्य असा तिचा लूक पाहायला मिळाला.
5 / 5
रुचिराने जोडलेल्या हातांनी भक्तिभावाने प्रार्थना करतानाचे फोटोही चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. लालबागच्या राजाच्या भव्य मंडपात दर्शन घेतानाचे हे क्षण तिच्या पोस्टमधून पाहायला मिळतात.
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us