तू साडीमध्ये किती सुंदर दिसते.., पांढऱ्या साडीमधील ही सौंदर्य क्वीन कोण? सौंदर्याने लावलं वेड
पांढऱ्या साडीत सुना येती घरा फेम अभिनेत्रीचं खास फोटोशूट. सौंदर्य आणि लुक असा की बघतच राहावं. फोटो पाहून चाहते देखील झाले घायाळ. कोण आहे ती?

टीव्हीवरील ‘सुना येती घरा’ ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. मालिकेतील भावनिक घडामोडी आणि रंजक कथानकामुळे ही मालिका सोशल मीडियासह चाहत्यांमध्ये प्रचंड चर्चेत आहे.
या मालिकेत अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत ‘पद्मावती’ ही खलनायिकेची भूमिका साकारत आहे. आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणाऱ्या शर्मिष्ठाने आता नवरात्रीनिमित्त केलेल्या खास फोटोशूट केलं आहे.
नवरात्रीच्या निमित्ताने शर्मिष्ठाने खास पारंपरिक लूक केला आहे. निळ्या रंगाची किनार असलेली पांढऱ्या रंगाची सुंदर इरकल साडी तिने परिधान केली आहे. या फोटोत तिचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत आहे.
तिच्या फोटोशूटची चर्चा चाहत्यांमध्ये रंगली आहे. साधेपणा आणि पारंपरिक शैली यांचा सुंदर मिलाफ तिच्या या लूकमध्ये पाहायला मिळतो.
‘सुना येती घरा’ मालिकेत नकारात्मक भूमिका साकारणारी शर्मिष्ठा राऊत प्रत्यक्ष आयुष्यातील या सुंदर पारंपरिक अंदाजामुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिच्या या खास फोटोशूटवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे.