
अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिने मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. विशेष म्हणजे शिल्पा शेट्टी ही सोशल मीडियावरही सक्रिय दिसते. आपल्या फिटनेसकडे शिल्पा लक्ष देते.

शिल्पा शेट्टी ही नुकताच आता मुंबई एअरपोर्टवर स्पॉट झालीये. अभिनेत्रीला पाहून चाहते हे चांगलेच हैराण झाल्याचे बघायला मिळतंय. शिल्पा शेट्टीच्या लूकचे काैतुक केले जातंय.

शिल्पा शेट्टी ही एअरपोर्टवर एकदम देसी स्टाईलमध्ये पोहोचली. शिल्पा शेट्टी ही भगव्या रंगाच्या सूटमध्ये दिसली. तिचा लूक लोकांना आवडलाय.

विशेष म्हणजे फोटोसाठी पापाराझी यांना पोझ देताना देखील शिल्पा शेट्टी ही दिसली आहे. शिल्पा शेट्टीचे हे फोटो चांगलेच व्हायरल होताना दिसत आहेत.

शिल्पा शेट्टी ही सोशल मीडियावर तिच्या व्यायामाचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. शिल्पा शेट्टीचा चाहता वर्ग अत्यंत मोठा आहे.