
झी टीव्हीवरील लोकप्रिय मालिका 'कुंडली भाग्य'मधील करण आणि प्रिता यांची लव्ह स्टोरी प्रेक्षकांच्या खूप पसंतीस उतरली.

मालिकेत एका आदर्श सुन आणि आदर्श पत्नीची भूमिका साकारणारी अभिनेत्री श्रद्धा आर्या सध्या सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह असते.

मालिकेत नेहमी पारंपारिक पेहरावात दिसत असलेली श्रद्धा आर्या आता हटके लूकमध्ये दिसली आहे. खऱ्या आयुष्यात तिची लाईफस्टाइल प्रचंड स्टाइलिश आहे.

ती सोशल मीडियावर नेहमी तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. तिचे हे फोटो चाहत्यांच्या चांगलेच पसंतीस उतरत आहेत.

अभिनेत्री श्रद्धा आर्यानं हे खास फोटोशूट झी रिश्ते अवॉर्ड्ससाठी केला आहे. या अवॉर्ड्ससाठी ती खास तयार झाली होती.

या पांढऱ्या गाऊनमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे. या पांढऱ्या गाऊनवर पर्ल वर्क आहे आणि हा गाऊन ऑफ शोल्डर् आहे.

आर्याचे हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रेंडमध्ये आहेत.