
अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी सोशल मीडियावर कायम चर्चेचा विषय ठरते. कधी तिच्या कपड्यावरून तर कधी तिच्या तब्येतीवरून तिला ट्रोल केले जाते.

नुकतंच पलक तिवारीने दिल्ली फॅशन वीकमध्ये रॅम्प वॉक केला.त्याच्या व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यामध्ये तिने ब्लॅक लेदर पॅन्ट, ब्रॅलेट आणि जॅकेट कॅरी असा आऊट फीट कॅरी केला होता.

पलकच्या या रॅम्प वॉकवरून नेटकऱ्यांनी तिला या चांगलेच ट्रोल केले आहे. नेटकऱ्यांनी तिच्या 'तू रॅम्पवर कसे चालायचे ते शिकले पाहिजे, एका यूजरने लिहिले की 'आप सिर्फ बिजली गिराओ रैंप वॉक न किया करो.' असे म्हटले आहे.

आणखी एका युझरने लिहिले आहे, की तुमचा रॅम्प वॉक नोरा फतेहीच्या एअरपोर्ट वॉक सारखा दिसतोया असे म्हणत तिच्या वॉकची तुलना नोरा फतेहीच्या एअरपोर्ट लुक सोबत केली आहे.

पलक तिवारीने यापूर्वी फ्लोरल गाऊन परिधान करून रॅम्प वॉक केला होता. त्यावेळीही त्याला ट्रोलिंगला सामोरे जावे लागले होते. लोकांनी त्याला प्रचंड ट्रोल केले होते.

काही दिवसांपूर्वी पलकला तिच्या लूकसाठी सोशल मीडियावर ट्रोल केले होते, त्यावेळी टी म्हणाली होती की मला कोणाचीही पर्वा नाही. कारण हे लोक कशातच खूश नसतात.

व्यावसायिक आयुष्याबाबत बोलायचे झालेतर पलकने 'बिजली-बिजली' आणि 'मांगता है क्या' सारख्या गाण्याच्या अल्बममध्ये काम केले आहे, ही दोन्ही गाणी हिट झाली आहेत.

पलकचे इंस्टाग्रामवर1.8 मिलियन फॉलोवर आहेत. तिची फॅनफॉलोईंग बॉलीवूडमधील एखाद्या मोठ्या अभिनेत्रीपेक्षा कमी नसलेली दिसून आली आहे.