
अनेक म्युझिक व्हिडीओंमध्ये आपली वेगळी छाप पाडल्यानंतर अभिनेत्री स्मिता गोंदकरनं बऱ्याच काळानंतर पुन्हा एकदा ‘साजणी तू’ या म्युझिक व्हिडीओद्वारे या कमबॅक केलं आहे.

उत्तम शब्द, श्रवणीय संगीत, देखणं छायाचित्रण असा योग या म्युझिक व्हिडिओमध्ये जुळून आला आहे. सप्तसूर म्युझिकच्या या म्युझिक व्हिडीओंना आतापर्यंत मिळालेला भरभरून प्रतिसाद पाहता 'साजणी तू' सुद्धा प्रेक्षकांची दाद मिळाली आहे.

याच सेटवरील काही फोटो आता स्मितानं तिच्या सोशल मिडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत.

पिवळ्या रंगाच्या या ड्रेसमध्ये ती कमालीची सुंदर दिसतेय.

अभिनेत्री असण्यासोबतच स्मिता मॉडेल आणि उत्तम ‘बायकर’देखील आहे. अनेकदा ती बाईक स्टंटच्या साहसी खेळांमध्ये सहभागी होत असते. ‘पप्पी दे पारूला’ या आयटम साँगपासून चर्चेत आलेली स्मिता थेट ‘बिग बॉस मराठी’ मधील पहिल्या सीझनमध्ये झळकली होती. तेव्हापासून स्मिताचे चाहते खूपच वाढले आहेत. त्यानंतर स्मिताला अनेक चित्रपटांच्या ऑफरही येऊ लागल्या.