
तमन्ना भाटिया चित्रपट सृष्टीतील मोठं नाव आहे. तिने हिंदी चित्रपटांसोबत तामिळ, तेलुगु चित्रपटात सुद्धा काम केलय. तिन्ही इंडस्ट्रीमध्ये अभिनेत्रीची मोठी फॅन फॉलोइंग आहे. तमन्ना चित्रपटातील अभिनयाशिवाय तिच्या सौंदर्यामुळे सुद्धा चर्चेत असते. अलीकडेच अभिनेत्रीने एका मुलाखतीत आपली ब्युटी सिक्रेट आणि हॅकबद्दल खुलासा केला.

लल्लनटॉपच्या मुलाखतीत तमन्नाला तिच्या चेहऱ्यावरील पिंपल्स संपवण्याबद्दल विचारण्यात आलं. त्यावर अभिनेत्रीने जे उत्तर दिलं, त्याने सगळेच हैराण झाले. हे ब्युटी हॅक काय आहे जाणून घ्या.

अभिनेत्रीने चेहऱ्यावरील पिंपल्सबद्दल सांगितलं की, पिंपल्स घालवण्यासाठी ती सकाळी उठल्यावर चेहऱ्यावर थुंकी लावते. लोकांना हे ऐकून थोडं विचित्र वाटेल. पण हे सिक्रेट आहे.

अभिनेत्रीने सांगितलं की, हे तिचं पर्सनल सिक्रेट आहे. जे उपयुक्त ठरतं. तमन्नाने सांगितलं की, यामागे वैज्ञानिक कारण आहे. कारण सकाळच्या थुंकीमध्ये अँटी बॅक्टेरियल एलिमेंट असतात.

अभिनेत्रीने एक किस्सा सांगितला. एकवेळ ती घरात बसलेली. तिने कोणताही मेकअप केला नव्हता. तिच्या चेहऱ्यावर एक पिंपल होता. त्यावेळी कुत्रा फिरवायला आलेल्या एका माणसाने तिला म्हटलं, तुमच्या चेहऱ्यावर सुद्धा पिंपल येतात का?. त्यावर तिने हसून उत्तर दिलं, भरपूर सारे असतात.