
उर्फी जावेद ही तिच्या कपड्यांमुळे नेहमीच नेटकऱ्यांच्या निशाण्यावर असते. आता परत एकदा उर्फी जावेद ही चर्चेत आलीये. मात्र, यावेळी ती तिच्या कपड्यांमुळे नाही तर थोड्या वेगळ्या कारणामुळे चर्चेत आलीये.

एका 95 वयाच्या व्यक्तीच्या मदतीला धावून उर्फी जावेद ही गेलीये. गुजरातमध्ये राहणारे 95 वयाचे एक व्यक्ती लग्नामध्ये ताशा वाजवण्याचे काम करतात. मात्र, आता वयामुळे त्यांना ते करणे शक्य होत नाहीये.

या व्यक्तीकडे दोन वेळेचे जेवणापुरते देखील पैसे नाहीत. यामुळे या वयात देखील त्यांना काम करावे लागत आहे. याचा व्हिडीओ फोटोग्राफर ऋत्विक पांडेने शेअर केला होता.

हा व्हिडीओ उर्फी जावेद हिच्यापर्यंत पोहचला आणि थेट उर्फी जावेद हिने संपर्क करत या ज्येष्ठ व्यक्तीची मदत केली आहे. या व्यक्तीच्या बॅंक अकाउंटमध्ये उर्फी जावेद हिने 12,500 रूपये पाठवले आहेत. विशेष म्हणजे दर महिन्याला उर्फी यांना पैसे देणार आहे
