लग्न होताच ‘या’ अभिनेत्रींनी घेतला मोठा निर्णय, जाणून आज करतात तरी काय?
झगमगत्या विश्वात अनेक अभिनेत्री आल्या त्यांनी स्वतःची ओळख देखील भक्कम केलं. पण एका रात्रीत रुपेरी पडद्यापासून त्यांनी स्वतःला दूर केलं... बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी लग्न झाल्यानंतर झगमगत्या विश्वाचा निरोप घेतला. या यादीमध्ये अनेक लोकप्रिय अभिनेत्री आहेत.

असिन थोट्टुमकालने - 19 जानेवारी 2016 रोजी मायक्रोमॅक्सचे सह-संस्थापक राहुल शर्मा यांच्याशी विवाह केल्यानंतर असिन थोट्टुमकालने झगमगत्या विश्वाचा निरोप घेतला. 'गजनी' सिनेमात ही अभिनेत्री शेवटची दिसली. आज आसिन तिच्या खासगी आयुष्यात आनंदी आहे.

मीनाक्षी शेषाद्री - अनेक ब्लॉकबस्टर सिनेमे बॉलिवूडला दिल्यानंतर मीनाक्षी शेषाद्री फिल्मी विश्वापासून दूर झाली. तिने बँकर हरीश मैसूर यांच्यासोबत लग्न केलं. आज अभिनेत्री तिच्या मुलांसोबत आणि पतीसोबत खासगी आयुष्यात आनंदी आहे.

ट्विंकल खन्ना - दिवंगत अभिनेते राजेश खन्ना आणि अभिनेत्री डिंपल कपाडिया यांची लेक ट्विंकल खन्ना हिने देखील अनेक सिनेमांमध्ये काम केलं. ट्विंकल हिने अभिनेता अक्षय कुमार याच्यासोबत लग्न केलं आणि बॉलिवूडपासून दूर झाली. आज ट्विंकल लेखिका आहे. सोशल मीडियावर देखील तिने अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात,

अनुष्का शर्मा - अभिनेता शाहरुख खान स्टारर 'रब ने बना दी जोडी' सिनेमातून अनुष्का हिने मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं. त्यानंतर अनुष्का हिने मागे वळून पाहिलं नाही. पण विराट कोहली याच्यासोबत लग्न केल्यानंतर अनुष्का कोणत्याच सिनेमात दिसली नाही.

मंदाकिनी - प्रसिद्ध अभिनेत्री मंदाकिनी हिने लग्नानंतर बॉलिवूडचा निरोप घेतला. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमसोबतच्या कथित पार्श्वभूमीवर, संबंधांवरून निर्माण झालेल्या वादांच्या तिने आपल्या कुटुंबावर लक्ष केंद्रित करण्यासाठी 1996 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'झोरदार' या शेवटच्या सिनेमानंतर ग्लॅमर जगताला रामराम ठोकला.