
अभिनेत्री अदा शर्मा तिच्या ग्लॅमरस फोटो आणि फिटनेस व्हिडिओंसाठी सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध आहे. 11 मे 1992 रोजी मुंबईत जन्मलेल्या अदाने 2008 मध्ये विक्रम भट्टच्या '1920' या हॉरर चित्रपटातून करिअरला सुरुवात केली.

या चित्रपटातील तिची लिसाची भूमिका प्रेक्षकांना चांगलीच आवडली होती. 2014 मध्ये रोमँटिक कॉमेडी चित्रपट 'हसी तो फसी' रिलीज झाल्यानंतर, तिने दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीमध्ये प्रवेश केला.पुढे ती तेलुगू आणि कन्नड चित्रपटांचा एक भाग बनली.

इंडस्ट्रीतील फिट अभिनेत्री म्हणून अदा गणली जाते. ती दररोज तिच्या वर्कआउट आणि डान्सचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते.

अदा शर्माचे वडील एस.एल. शर्मा मर्चंट नेव्हीमध्ये कॅप्टन होते आणि त्यांची आई शास्त्रीय नृत्यांगना आहे. अदाने दहावीत असतानाच तिने ठरवलं होतं की तिला अभिनेत्री व्हायचं आहे.