Adinath Kothare: रणबीरनं मला कोपरानं धक्का दिला अन्… आदिनाथ कोठारेने सांगितला एकत्र काम करण्याचा अनुभव

Adinath Kothare: मराठमोळा अभिनेता आदिनाथ कोठारे लवकरच रामायण या सिनेमात बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरसोबत दिसणार आहे. नुकताच त्याने एका मुलाखतीमध्ये रणबीर कपूरसोबत काम करतानाचा अनुभव सांगितला आहे.

| Updated on: Oct 17, 2026 | 11:28 AM
1 / 5
फिल्म इंडस्ट्रीमधील  सध्याचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित सिनेमा रामायणचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. 4000 कोटी रुपयांचे बजेट असलेला हा सिनेमा कधी प्रदर्शित होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या चित्रपटात अभिनेता रणबीर कपूर, अभिनेत्री साई पल्लवी, मराठमोळा अभिनेता आदिनाथ कोठारे,रवि दुबे, सनी देओल, लारा दत्ता आणि इतर अनेक कलाकार दिसणार आहेत. दरम्यान, आदिनाथ कोठारेने रणबीरसोबत काम करतानाचा अनुभव सांगितला आहे.

2 / 5

आदिनाथ कोठारेने न्यूज 9ला दिलेल्या मुलाखतीमध्ये रामायण सिनेमाच्या शुटिंगच्या पहिल्याच दिवशी आलेला अनुभव सांगितला आहे. तो म्हणाला, "आमच्या सिनेमाच्या पहिल्या सीनवेळी आम्ही सर्वजण भाऊ म्हणून एका रांगेत उभे होतो. रणबीर श्रीरामाच्या भूमिकेत, रवी दुबे लक्ष्मणाच्या भूमिकेत आणि मी भरताच्या भूमिकेत होतो. दुसरीकडे साई पल्लवी सीतेच्या भूमिकेत आणि इतर कलाकार शूटिंग करत होते."

3 / 5

पुढे आदिनाथ म्हणाला की, "तो शुटिंगचा माझा पहिलाच दिवस असल्याने, मी कोणत्याही प्रकारची इम्प्रोव्हेयझेशन करण्यापूर्वी सेटवरचे वातावरण समजून घेत होते. खूप काळजीपूर्वक वागत होतो. अशातच रणबीरने माझ्या मनातला संकोच दूर करण्यासाठी मदत केली. टेक सुरू होण्याच्या बरोबर आधी त्याने मला कोपराने हलकासा धक्का दिला आणि म्हणाला की, 'आदी, असे कर. चांगले दिसेल...'

4 / 5

"मी ते तसंच केले. काही क्षणांनंतर नितेश सरांनी म्हटले की, 'अरे आदि, खूप छान केलंस!' मी त्यांना उत्तर दिले की, 'धन्यवाद सर, ते मला रणबीरने सुचवले!'" असे अदिनाथ म्हणाला.

5 / 5

नितेश तिवारी दिग्दर्शित रामायण हा सिनेमा दोन भागांमध्ये प्रदर्शित होणार आहे. पहिला भाग 5 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. तर दुसरा भाग 2027मध्ये प्रदर्शित होणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ट्रेलर पाहून चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता पाहायला मिळते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us