
नुकतेच रशियाने अफगाणिस्तानमधील तालीबान सरकारला मान्यता दिली आहे. त्यामुळे आता अफगाणिस्तान आणि तेथील सरकार यांची पुन्हा एकदा चर्चा होत आहे.

अफगाणिस्तानमध्ये तालिबान सरकार आल्यानंतर तेथे अनेक नियमांत बदल करण्यात आले आहेत. अनेक गोष्टींवर बंदी घालण्यात आली आहे.

विशेषत: मलिहांच्या स्वातंत्र्याची गळचेपी करणारे अनेक नियम तिथे घालण्यात आले आहे. तालिबानमध्ये ब्युटी पार्लवर बंदी आहे.

तालिबानच्या म्हणण्यांनुसार इस्लाममध्ये ब्युटी पार्लर हराम आहे. इस्लाममध्ये हराम असणाऱ्या अनेक सेवा ब्युटी पार्लरच्या माध्यमातून दिल्या जातात, असा तालिबानचा दावा आहे.

याच बंदीमुळे येथेत अफगाणिस्तानमध्ये महिलांनी ब्युटी पार्लमध्ये जाऊन मेकअप केला, लिपस्टिक लावली तर शिक्षा मिळते.