
आजकालच्या आयुष्यात मोबाईल फोनने आपलं आयुष्य व्यापलं आहे. आजकाल आपले फोन, मोबाईल हे इतर कामांइतकेच महत्त्वाचे आहेत. केवळ मनोरंजनच नाही तर इतर अनेक महत्त्वाची कामे देखील फोनद्वारे केली जात आहेत. मात्र, आपला फोन जितका महत्त्वाचा आहे तितकाच त्याचा चार्जर देखील तितकाच महत्त्वाचा आहे. फोन चालू ठेवण्यासाठी तो चार्ज करणे खूप महत्वाचे आहे.

बहुतेक लोक त्यांचे फोन चार्जिंगवरून काढून टाकतात, पण चार्जर प्लग इन करून ठेवतात. मात्र असं करणं योग्य आहे का? असे केल्यानंतरही चार्जरद्वारे वीज वापरली जाते का? चला जाणून घेऊया

वापरात नसताना खूप कमी लोक त्यांचा चार्जर सॉकेटमधून काढून ठेवतात, मात्र बरेच लोकं चार्जर तसाच तो प्लग इन करूनच ठेवतात. एनर्जी सेव्हिंग ट्रस्टच्या मते, कोणताही स्विच ऑन चार्जर प्लग इन केलेला असताना वीज वापरत राहतो. तुमचे डिव्हाइस त्याच्याशी जोडलेले असो की नसो, वीज वापरली जाते. यामुळे केवळ काही युनिट वीजच वापरली जात नाही तर चार्जरचे आयुष्य देखील हळूहळू कमी होते.

जर तुम्ही चार्जर प्लग इन करून तसाच ठेवला तर तो पॉवर वापरत राहतो. याला 'स्टँडबाय पॉवर' म्हणतात. याचा अर्थ असा की चार्जर डिव्हाइसशी जोडलेला असो वा नसो, तो काही प्रमाणात पॉवर काढत राहतो. यामुळे खूप वीज वाया जाते. चार्जर जास्त वेळ प्लग इन ठेवल्याने तो जास्त गरम होणे, सॉकेट जळणे आणि शॉर्ट सर्किट होऊ शकते.

याव्यतिरिक्त, प्लग-इन चार्जरचे अंतर्गत भाग गरम होत राहतात. हे विशेषतः तेव्हा होतं जेव्हा तुमच्याकडे ओरिजनलचर्जर नसतो. याव्यतिरिक्त, प्लग-इन चार्जरचे अंतर्गत भाग गरम होत राहतात, ज्यामुळे त्याचे घटक खराब होऊ शकतात आणि आगीचा धोका वाढू शकतो. कधीकधी व्होल्टेज वाढल्यामुळे चार्जरला आग देखील लागू शकते. म्हणूनच, डिव्हाइस चार्ज केल्यानंतर, तो चार्जर, चार्जिंग पॉइंटवरून काढून टाकावा.

जेव्हा चार्जर सतत प्लगशी जोडलेला असतो तेव्हा उष्णतेमुळे त्याचे अंतर्गत घटक खराब होऊ लागतात. यामुळे चार्जरची कार्य क्षमता कमकुवत होते आणि ते डिव्हाइस योग्यरित्या चार्ज करू शकत नाही. जर तुम्हाला चार्जर अनप्लग ठेवण्याची सवय लागली तर ते लवकर खराब होणार नाही.