
नताशा आणि अनुष्काच्या पोलका डॉट ड्रेसमुळे चर्चेला उधाण आलेलं पाहायला मिळालं. विशेष म्हणजे काळ्या ड्रेसवर पोलका डॉट असलेला ड्रेस परिधान करणं म्हणजे काही तरी गुड न्यूज असा समज सोशल मीडियावर नेटीझन्सनं करुन ठेवला आहे. त्यात आता अभिनेत्री अनिता हसनंदानीची भर पाडली आहे.

अनितानं पोलका डॉट असलेला काळ्या रंगाचा ड्रेस परिधान करुन सोशन मीडियावर पोस्ट केला आहे.

अनिता सध्या प्रेग्नंट आहे. तर अनुष्का शर्मा आणि नताशा दोघींसुद्धा चाहत्यांना गुड न्यूज दिली तेव्हा पोलका डॉट असलेलाचं ड्रेस परिधान केला होता.

नताशा आणि अनुष्कानं शॉर्ट ड्रेस परिधान केला होता तर अनितानं मॅक्सी ड्रेस परिधान केला आहे. मात्र स्टाइल सारखीच आहे.

सोबतच अनितानं आपल्या पतीसोबतचा फोटोसुद्धा पोस्ट केला आहे. त्याला तिनं कॅप्शनही मजेदार दिलं आहे. 'या फोटोत तुम्ही माझ्या मोठ्या बेबीला सुद्धा पाहू शकता' असा उल्लेख तिनं पती रोहनचा केला आहे.