
जळगावात क्रिकेटच्या मैदानावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी फलंदाजी करत जोरदार फटकेबाजी केली आहे.

जैन उद्योग समूहाचे उद्योजक अशोक जैन यांच्या गोलंदाजीवर आमदार रोहित पवार यांनी टोलेबाजी करीत चौफेर फटकेबाजी केली आहे.

आमदार रोहित पवार यांनी चक्क लेदरच्या बॉलवर कुठलही किट न घालता कसलेल्या खेळाडू प्रमाणे फटकेबाजी करण्याचा आनंद लुटला

जळगावात अनुभूती निवासी स्कूलमध्ये सीआयएससीई १७ वर्षाखालील क्रिकेट राष्ट्रीय अजिंक्यपद-२०२५ स्पर्धांचे उद्घाटनासाठी आमदार रोहित पवार उपस्थित होते.

या स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी आमदार रोहित पवार यांनी क्रिकेटच्या मैदानावर जोरदार बॅटिंग करत उपस्थितांचे लक्ष वेधले. हिरव्यागार क्रिकेट मैदानावर आमदार रोहित पवार यांना फलंदाजी करण्याचा मोह आवरला नाही.

राजकारणात आल्यावर स्पिन असो गुगली असो की कोणताही चेंडू हा खेळावाच लागतो.. वेडा वाकडा आणि गावठी शॉट मारायला नको एवढेच काळजी घ्यावी लागते असे रोहित पवार यावेळी म्हणाले.

राजकीय जीवनामध्ये माझे अनेक प्रशिक्षक आहेत, तसेच मराठी मीडियामध्ये सुद्धा आहेत अशी प्रतिक्रिया यावेळी आमदार रोहित पवार यांनी दिली.