
चंकी पांडे याची लेक अनन्या पांडे ही गेल्या काही दिवसांपासून बाॅलिवूडमध्ये धमाल करताना दिसत आहे. अनेक चित्रपटांमध्ये अनन्या पांडे हिने काम केले. विजय देवरकोंडा याच्यासोबत काम करण्याची संधी देखील थेट अनन्या हिला मिळालीये.

नुकताच आलेल्या रिपोर्टनुसार आता अनन्या हिच्यानंतर तिचा चुलत भाऊ आणि चंकी पांडेच्या भावाचा मुलगा अहान हा देखील लवकरच बाॅलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. मोठ्या बॅनरखाली धमाकेदार पध्दतीने त्याला बाॅलिवूडमध्ये लाॅन्च केले जाणार आहे.

इतकेच नाही तर अहान हा थेट मोठ्या चित्रपट निर्मात्याच्या हाताखाली ट्रेन होत आहे. अहान याला साइन देखील करण्यात आल्याचे कळत आहे. मोठ्या स्टारमध्ये अहान याला खास ओळख मिळण्याची शक्यता आहे.

पुढच्या वर्षी सुरूवातीलाच अहान याचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येऊ शकतो. अहानमध्ये एक मोठा स्टार निर्माते शोधत आहेत. विशेष म्हणजे चित्रपट निर्माते हे अहान याच्यावर खूप जास्त प्रभावित असल्याचे देखील सांगितले जात आहे.

अहान सध्या फुल मेहनत घेताना दिसत आहेत. अहान याला लवकरच बाॅलिवूडमध्ये मोठा ब्रेक मिळणार आहे. आता यामुळे अहान हा प्रचंड चर्चेत आलाय.