
क्रिकेटर हार्दिक पंड्याची पूर्व पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री-मॉडेल नताशा स्टेनकोविक सध्या गोव्यात सुट्टी एन्जॉय करतेय. तिने वेकेशनचे काही सुपर हॉट फोटो शेअर केलेत. त्याची सोशल मीडियावर एकच चर्चा आहे.

नताशाने पूल साइड काही सिजलिंग पोज देतानाचे फोटोज शेअर केलेत. त्यात ती खूप हॉट दिसतेय. रेड बिकिनी लुकमध्ये नताशाने तिच्या लूकने सर्वांनाच घायाळ केलय.

नताशाने कॅमेऱ्याकडे पाहून कॉन्फिडन्समध्ये मनमोहक पोज दिल्या आहेत. त्यावर युजर्सकडून वेगवेगळ्या कमेंट्स येत आहेत. काहींनी तिच्या बोल्डनेसच कौतुक केलय. तर एकाने तिला हे सर्व तुला शोभत नाही असं म्हणून सुनावलय.

टी 20 वर्ल्ड कप सुरु व्हायला एक दिवस उरलेला असताना नताशा स्टेनकोविकच्या लूकची, फोटोंची सोशल मीडियावर चर्चा आहे. नताशा हार्दिक पंड्याची पूर्वपत्नी आहे. त्यांना एक मुलगा आहे.

नताशा स्टेनकोविक आणि हार्दिक पंड्याचा दोन वर्षांपूर्वी घटस्फोट झाला. हार्दिक पंड्याच्या आयुष्यात आता दुसरी तरुणी आहे. पूल साइड रेड बिकिनीमध्ये नताशाने आपली टोन्ड बॉडी फ्लॉन्ट केली आहे. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळा ग्लो दिसतोय.