Ahmadabad Plane Crash: एअर इंडियाचे विमान ज्या मेडिकल हॉस्टेलवर आदळलं, त्याची सद्यस्थिती काय? फोटो पाहून हादराल

अहमदाबाद येथे एअर इंडियाच्या फ्लाइट AI-171 चा भीषण अपघात झाला आहे. लंडनच्या गॅटविक विमानतळाकडे जाणारे हे विमान मेघानीनगर येथील बीजे मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलवर कोसळले. विमानात भीषण आग लागली आणि हॉस्टेलचा मोठा भाग उध्वस्त झाला.

| Updated on: Jun 12, 2025 | 4:30 PM
1 / 13
गुजरातच्या अहमदाबादमध्ये एक मोठी आणि धक्कादायक दुर्घटना घडली आहे. गुरुवारी एअर इंडियाचे फ्लाइट क्रमांक AI-171 चा मोठा अपघात झाला.

गुजरातच्या अहमदाबादमध्ये एक मोठी आणि धक्कादायक दुर्घटना घडली आहे. गुरुवारी एअर इंडियाचे फ्लाइट क्रमांक AI-171 चा मोठा अपघात झाला.

2 / 13

हे विमान अहमदाबादहून लंडनमधील गॅटविकला जात होते. मात्र टेकऑफनंतर काही क्षणात ते मेघानीनगर येथील निवासी परिसरात असलेल्या बीजे मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलच्या इमारतीवर कोसळले.

3 / 13

हे विमान हॉस्टेलवर आदळल्यानंतर भीषण आग लागली. यामुळे सर्वत्र धुराचे मोठे लोट पाहायला मिळाले. या अपघाताची अनेक छायाचित्रे समोर आली आहेत.

4 / 13

यात विमानाचा मागील भाग हॉस्टेलच्या इमारतीवर पाहायला मिळत आहे. तर पुढील भाग पूर्णपणे जळून खाक झाला आहे.

5 / 13

हे विमान हॉस्टेलच्या ज्या भागावर कोसळले, तिथे कॅन्टीन आहे. दुपारच्या जेवणाच्या वेळी मेडिकलचे विद्यार्थी तिथे मोठ्या संख्येने उपस्थित असतात.

6 / 13

यामुळे या दुर्घटनेत साधारण २० विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मात्र, अद्याप याबद्दलची अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

7 / 13

या दुर्घटनेची माहिती मिळताच तात्काळ बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. NDRF च्या तीन टीम्स घटनास्थळी बचाव मोहीम राबवत आहेत.

8 / 13

तसेच वडोदराहून NDRF च्या आणखी दोन टीम्स मदतीसाठी अहमदाबादकडे रवाना झाल्या आहेत.

9 / 13

जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यासाठी अहमदाबादच्या सिव्हिल हॉस्पिटलपर्यंत ग्रीन कॉरिडोर तयार करण्यात आला आहे.

10 / 13

अहमदाबादचे नगर आयुक्त आणि पोलीस आयुक्त स्वतः घटनास्थळी उपस्थित राहून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. बचावकार्याची पाहणी करत आहेत.

11 / 13

या घटनेत एकूण किती जणांचा मृत्यू झाला, किती जण जखमी याबद्दलची अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

12 / 13

अवघ्या एका मिनिटात घडलेल्या या भीषण अपघातामुळे मोठी जीवितहानी झाल्याची भीती व्यक्त होत आहे.

13 / 13

सध्या घटनास्थळी वेगाने बचावकार्य सुरू आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us