
आदिवासी भागातील सुविधांसाठी नेहमीच मोठया प्रमाणात निधी मिळत असला तरी अनेक समस्या जैसे थे असतात. सोयी - सुविधांयुक्त आदिवासी मुलींच्या वसतिगृहासाठी एसबीआय इंश्युरंसने पुढाकार घेत सामाजिक बांधिलकी जपली.

अकोले तालुक्यातील राजूर येथे कंपनीच्या सीएसआर फंडातून भव्य इमारत उभारण्यात आलीय.

एसबीआय इन्शुरन्स कंपनीच्या वतीने स्वतःच्या सीएसआर फंडाचा उपयोग आदिवासी विद्यार्थ्यांनींसाठी केलाय.

अकोले तालुक्यातील राजूर गावात 100 मुलींना राहण्यासाठी सुसज्ज असे वसतिगृह बांधण्यात आलंय. यासाठी तब्बल एक कोटी 32 लाखांचा निधी खर्च करण्यात आलाय.

मुलगी शिकली प्रगती झाली या घोषवाक्या प्रमाणे एसबीआय इन्शुरन्सच्या वतीनं सत्यनिकेतन संस्थेच्या विद्यालयात हे वसतिगृह उभारण्यात आले आहे.

एसबीआय इन्शुरन्सचे कंपनीचे सीईओ पी.सी. कंडपाल यांच्या हस्ते या वसतीगृहाच लोकार्पण पार पडलय.

अकोले तालुक्यातील राजूर गावात 100 मुलींना राहण्यासाठी सुसज्ज असे वसतिगृह बांधण्यात आलंय. विद्यार्थिनींच्या उपस्थितीत लोकार्पण सोहळा पार पडला.