
मध्य रेल्वेच्या नगर - बीड - परळी रेल्वे मार्गाला चालना मिळाली आहे.

नगर-बीड- परळी वैजनाथ हा संपूर्ण रेल्वे मार्ग सुमारे 261.25 किमीचा आहे.

आतापर्यंत 99.53% टक्के जमिनीचे संपादन झाले आहे.

नगर-बीड- परळी या संपूर्ण प्रकल्पाची किंमत 4805.17 कोटी इतकी आहे.

आष्टी - किन्ही-बावी-अमळनेर-जतनदूर- इगनवाडी हा 67.12 किमीचा ( 5 स्थानके ) रेल्वे मार्ग यावर्षी तयार होणार आहे.

इगनवाडी ते परळी या 127.95 किमी रेल्वे मार्गिकेचे काम सुरु आहे.

सध्या नगर नारायण डोह-लोणी-सोलापूरवाडी-धानोरा-कडा-आष्टी असा 66.18 किमीचा मार्ग ( 7 स्थानके ) तयार झाला आहे.

नगर-बीड- परळी मार्गिकेसाठी एकूण 1814.58 हेक्टर जमिनीची गरज आहे.

नगर-बीड- परळी या नविन मार्गावर एकूण 23 स्थानके आहेत.