मोदींच्या आवाहनानंतर एअर इंडियाचा सर्वात मोठा निर्णय; आता परदेशात…वाचा नेमकं काय बदलणार?

दरम्यान, एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी असे आवाहन करताच देशातील प्रमुख विमान वाहतूक कंपन्यांपैकी एक असलेल्या एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला आहे. या विमानवाहू कंपनीने आपल्या परदेशातील विमानोड्डाणांची संख्या कमी केली आहे.

| Edited By: | Updated on: May 13, 2026 | 6:41 PM
1 / 5
इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्ध आणि या युद्धामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेवर आलेला दबाव लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीयांना काटकसरीने वागण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी परदेश दौरे कमी करण्याचे आवाहन केले आहे. सोबतच वर्षभरासाठी सोन्याची खरेदी करू नये, असेही ते म्हणाले आहेत.

2 / 5
दरम्यान, एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी असे आवाहन करताच देशातील प्रमुख विमान वाहतूक कंपन्यांपैकी एक असलेल्या एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला आहे. या विमानवाहू कंपनीने आपल्या परदेशातील विमानोड्डाणांची संख्या कमी केली आहे.

दरम्यान, एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी असे आवाहन करताच देशातील प्रमुख विमान वाहतूक कंपन्यांपैकी एक असलेल्या एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला आहे. या विमानवाहू कंपनीने आपल्या परदेशातील विमानोड्डाणांची संख्या कमी केली आहे.

3 / 5
आता नव्या निर्णयानुसार अनेक मार्गांवरील फ्लाईट्सना एअर इंडिया या कंपनीने अॅडजस्ट केले आहे. या कंपनीने प्रत्येक महिन्याला 1200 आंतरराष्ट्रीय विमानोड्डाण होतील, असे धोरण ठरवले आहे. ब्रिटन, उत्तर अमेरिका, युरोप तसेच इतर भागात ही विमानोड्डाणे होतील, असे सांगण्यात आले आहे.

4 / 5
उत्तर अमेरिकेला प्रत्येक आठवड्यात 33 फ्लाईट्स, युरोपसाठी प्रत्येक आठवड्याला 47 फ्लाईट्स, ब्रिटनसाठी प्रत्येक आठवड्याला 57 फ्लाईट्स, ऑस्ट्रेलिया 8, पूर्व आणि दक्षिण आशियामध्ये तसेच SAARC देशांसाठी एकूण 158 फ्लाईट्स असतील, असे या कंपनीने सांगितले आहे.

5 / 5
दरम्यान कच्च्या तेलाची, इंधनाची वाहतूक ज्या भागातून होते, तीच होर्मुझची सामुद्रधुनी सध्या बंद आहे. त्यामुळे इंधनाचा भाव वाढत असून त्याचा फटका विमान वाहतूक करणाऱ्या कंपन्यांना बसत आहे. असे असताना आता एअर इंडियाने अनेक मार्गांवरील विमानोड्डाणे कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.

Follow Us