
गुजरातच्या अहमदाबादमध्ये विमान दुर्घटना घडली आहे. एअर इंडियाचं प्रवासी विमान कोसळलं आहे.

अहमदाबादच्या मेघानी येथे ही दुर्घटना घडली आहे. विमानाच्या उड्डाणानंतर 10 मिनिटांनीच लगेच हे विमान कोसळलं.

242 प्रवासी घेऊन हे विमान लंडनला जात असल्याची माहिती मिळाली आहे. यात मोठं नुकसान झालं असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हे विमान नागरीवसाहत असलेल्या भागात कोसळलं त्यामुळे एकच खळबळ उडाली. अपघातानंतर हवेत मोठे धुराचे लोट पसरलेले दिसले.

सध्या बचावकार्य सुरू करण्यात आलेलं असून आजूबाजूचा सर्व परिसर रिकामा करण्यात आलेला आहे.

विमान कोसळल्यानंतर त्याला मोठ्या प्रमाणात आग लागली. ही आग विझवण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे.

दरम्यान, हा विमान अपघात झाला त्यावेळीचा एक व्हिडीओ देखील आता समोर आला आहे. त्यात विमान कसं कोसळलं याचं भयानक चित्रीकरण झालं आहे.