विमानात मिळणाऱ्या जेवणात का टाकतात दुप्पट मीठ? एअर हॉस्टेसनेच सांगितलं सीक्रेट

विमानप्रवासादरम्यान भूक लागल्यास प्रवासी एअर हॉस्टेसकडे जेवणाची ऑर्डर देतात. कधी नाश्ता तर कधी संपूर्ण जेवण विमानात दिलं जातं. परंतु या जेवणात मीठाचं प्रमाण सर्वसामान्यापेक्षा अधिक असतं. यामागचं कारण खुद्द एका एअर हॉस्टेसने सांगितलं आहे.

| Updated on: Jul 13, 2025 | 4:18 PM
1 / 10
फ्लाइटमध्ये 30 हजार फूट उंचावर जेव्हा भूक लागते, तेव्हा एअर हॉस्टेसजवळ अनेक प्रकारचे पर्याय उपलब्ध असतात. त्यातून जे आवडेल, त्याची निवड प्रवासी करतो.

2 / 10
विमानात स्वत: प्रवाशांना जेवण वाढणाऱ्या एका फ्लाइट अटेंडंटने सांगितलं की, विमानात कोणताही पदार्थ विचार न करता लगेच खाऊ नये.

3 / 10
विशेषकरून स्पाइसी (तिखट) आणि सॉल्टेड (खारट) पदार्थ तर अजिबात खाऊ नयेत. यामागचं कारणसुद्धा तिने सांगितलं आहे. हे कारण अनेकांना माहीत नसेल.

4 / 10
'डेली मेल'च्या रिपोर्टनुसार, अनुभवी एअर हॉस्टेस सेलिना बेडिंगने प्रवाशांना विमानात दिलं जाणारं अन्न पूर्णपणे टाळण्याचं आवाहन केलं आहे.

5 / 10
हे कितीही धक्कादायक वाटलं तरी, तिने हे स्पष्ट केलंय की विमानात मिळणाऱ्या जेवणात मीठ आणि साखरेचं प्रमाण जास्त असतं.

6 / 10
तिने सांगितलं की विमानात दिल्या जाणाऱ्या खारट पदार्थांमध्ये दुप्पट प्रमाणात मीठ असतं. हे केबिनमधील म्हणजेच विमानातील दाबामुळे होतं.

7 / 10
दाबामुळे प्रवाशांच्या जीभेवरील जवळपास 30 टक्के टेस्ट बड (स्वाद कळ्या) काही वेळासाठी खराब होतात.

8 / 10
त्यामुळे एअरलाइन्ससाठी जेवण तयार करणाऱ्या कंपन्या 40 हजार फूट उंचावर चांगल्या स्वादासाठी त्यात जास्त मीठ मिसळतात.

9 / 10
सेलिनाने सांगितलं की जर तुम्हाला विमानात जेवायचं असेल, तर सर्वोत्कृष्ट पर्याय म्हणजे सॅलेड.

10 / 10
प्रवासी विमानात ग्रीन सॅलेड किंवा फ्रूट सॅलेडचा आस्वाद घेऊ शकतात. त्यामुळे शरीरसुद्धा हायड्रेटेड राहण्यास मदत होते.