
सध्या थंडीचे दिवस आहेत. वातावरणात गारवा असतो. सोबतच सगळीकडे धुकं असतं. सध्याच्या या वातावरणात आकाशात विमानाला प्रवास करण्यासाठीही अनेक अडचणी येतात. त्यामुळेच विमानांचे उड्डाण अनेक तास उशिराने होते.

अशा स्थितीत तुम्ही परदेशात किंवा भारतात कुठेही फिरायचे नियोजन करत असाल तर विमान प्रवासाचे काही नियम तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे यातील काही नियम माहीत असल्यावर तुम्हाला चांगलाच फायदा होऊ शकतो. एका नियमाच्या मदतीने तर तुम्हाला फाईव्ह स्टारसारख्या महागड्या हॉटेलमध्येही राहता येईल.

तुम्हाला ज्या फ्लाईटने जायचे असत, अगदी तीच फ्लाईट कधीकधी उशिराने येते. विमानाला यायला उशीर असतो. अशा स्थितीत तुम्हाला एकही रुपया न खर्च करता थेट महागड्या हॉटेलमध्ये राहता येऊ शकते. विशेष म्हणजे अशा स्थितीत तुमची काळजी घेण्याची ही जबाबदारी विमान वाहतूक कंपनीची असते.

नियमानुसार तुमच्या विमानाची वेल रात्री 8 ते सकाळचे 3 वाजेदरम्यानची असेल आणि हेच विमान सहा तासांपेक्षा जास्त उशिराने येणारे असेल तर विमान वाहतूक कंपनीला तुमच्या राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था करावी लागते. विशेष म्हणजे त्यासाठी लागणारा सर्व खर्च विमान वाहतूक कंपनीलाच करावा लागतो.

यामध्ये तुम्हाला हॉटेलमध्ये रुम दिली जाते. जेवण दिले जाते. सोबतच येण्यासाठी आणि जाण्यासाठी टॅक्सीदेखील दिली जाते. सगळं काही एकदम मोफत असतं. तुम्हाला फक्त नियमांचे पालन करावे लागते. विमान वाहतूक कंपनीच्या नियमात तुम्ही बसत असाल तर तुम्हाला फ्रीमध्ये हॉटेलमध्ये राहता येऊ शकतं.