Airtel च्या ग्राहकांना थेट 3800 रूपयांचा फायदा, असा घ्या लाभ

Airtel : एअरटेल ही देशातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी दूरसंचार कंपनी आहे. देशभरात 41 कोटींहून अधिक ग्राहक कंपनीच्या सेवा वापरतात. आता एअरटेल आपल्या ग्राहकांसाठी एक आकर्षक ऑफर घेऊन आली आहे. या नव्या ऑफरअंतर्गत ग्राहकांना हजारो रुपयांचा थेट फायदा मिळणार आहे.

बापू गायकवाड | Updated on: Jun 25, 2026 | 7:10 PM
1 / 5
एअरटेलकडे कोट्यवधी ग्राहक आहेत. ग्राहकांच्या सोयीसाठी कंपनी वेळोवेळी विविध ऑफर्स आणत असते. कधी स्वस्त रिचार्ज प्लॅन्स तर कधी विशेष आकर्षक ऑफर्स सादर केल्या जातात.

एअरटेलकडे कोट्यवधी ग्राहक आहेत. ग्राहकांच्या सोयीसाठी कंपनी वेळोवेळी विविध ऑफर्स आणत असते. कधी स्वस्त रिचार्ज प्लॅन्स तर कधी विशेष आकर्षक ऑफर्स सादर केल्या जातात.

2 / 5

कंपनीने मोबाईल वापरकर्त्यांसाठी Airtel Insider नावाचा नवीन रिवॉर्ड प्रोग्राम सुरू केला आहे. या प्रोग्रामअंतर्गत ग्राहकांना सुमारे 3800 रुपयांपर्यंतचे प्रीमियम सबस्क्रिप्शन मोफत दिले जात आहेत. सध्या या ऑफरबाबत कंपनीकडून अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र, अनेक ग्राहकांना Airtel Thanks अॅपमध्ये ही ऑफर दिसत असल्याचे समोर आले आहे.

3 / 5

हा एअरटेलचा नवीन लॉयल्टी आणि रिवॉर्ड्स प्रोग्राम असून, रिचार्जसोबत अतिरिक्त लाइफस्टाइल आणि डिजिटल सुविधांचा लाभ देण्यासाठी तो सुरू करण्यात आला आहे. या अंतर्गत ग्राहकांना अनेक विशेष ऑफर्स आणि फायदे मिळतात. ग्राहक हे रिवॉर्ड्स Airtel Thanks अॅपमधील Rewards आणि OTT विभागात पाहू शकतात.

4 / 5

या सबस्क्रिप्शनची सामान्य किंमत 2997 रुपये आहे. यामुळे नोकरीसाठी अधिक प्रभावीपणे अर्ज करता येतो, तुमची प्रोफाइल कोणी पाहिली हे समजू शकते आणि LinkedIn Learning वरील विविध कोर्सेसचाही लाभ घेता येतो. या ऑफरमध्ये ग्राहकांना 3 महिन्यांसाठी मोफत प्रवेश दिला जात आहे.

5 / 5

2 महिन्यांसाठी EazyDiner Prime देखील फ्री मिळत आहे. याची किंमत साधारणपणे 850 रुपये आहे. बाहेर जेवायला जाण्याची आवड असणाऱ्यांसाठी ही ऑफर फायदेशीर ठरू शकते. या ऑफर्सचा लाभ घेण्यासाठी मोबाईलमध्ये Airtel Thanks अॅप उघडा. होम स्क्रीनवर उजव्या खालच्या बाजूला Airtel Insider नावाचा छोटा बॅनर दिसेल. त्या बॅनरवर टॅप करा. त्यानंतर उपलब्ध ऑफर्सची यादी दिसेल. आवडती ऑफर निवडा आणि Claim बटणावर क्लिक करून ती ऑफर मिळवा.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us