ऐश्वर्या रायच्या सुपरहिट चित्रपटातील गाणं, प्रदर्शित होताच संगीतकाराने गमावला जीव; रिलिजच्या दुसऱ्या दिवशीच…

बॉलिवूडमधील काही चित्रपट त्यांच्या कथेसोबतच गाण्यांमुळेही प्रेक्षकांच्या लक्षात राहतात. इतकेच नव्हे तर गाण्यांना अजरामर करणारे संगीतकार देखील यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. ऐश्वर्या राय आणि बॉबी देओल यांचा ‘और प्यार हो गया’ हा चित्रपटही त्यापैकी एक असून, त्यातील गाण्यांना आजही पसंती मिळते. त्यातील एक गाणं खूप चर्चेत आलं होतं, कारण या चित्रपटातील संगीतकाराने चित्रपट प्रदर्शित झाल्याच्या दुसऱ्या दिवशीच सिनेसृष्टीला निरोप दिला होता.

| Updated on: Oct 10, 2026 | 5:38 PM
1 / 5
15 ऑगस्ट 1997 रोजी ‘और प्यार हो गया’ चित्रपट प्रदर्शित झाला. नुसरत फतेह अली खान यांच्या निधनाच्या एक दिवस आधी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.

15 ऑगस्ट 1997 रोजी ‘और प्यार हो गया’ चित्रपट प्रदर्शित झाला. नुसरत फतेह अली खान यांच्या निधनाच्या एक दिवस आधी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.

2 / 5

राहुल रवैल यांनी या रोमँटिक चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. ऐश्वर्या रायचा हा डेब्यू चित्रपट होता, तर बॉबी देओलनेही मुख्य भूमिका साकारली होती.

3 / 5

चित्रपटातील 9 गाण्यांना नुसरत फतेह अली खान यांनी संगीत दिले होते. जावेद अख्तर यांनी गाण्यांचे बोल लिहिले, तर अमर हल्दीपूर यांनी पार्श्वसंगीत दिले.

4 / 5

उदित नारायण, अलका याग्निक, सोनू निगम, आशा भोसले, अनुराधा पौडवाल आणि नुसरत फतेह अली खान यांनी गाण्यांना आवाज दिला. ‘कोई ना जाने कोई ना जाने’ हे गाणे त्यांच्या अचनक निधनानंतर विशेष चर्चेत आलं.

5 / 5

चित्रपटाची कथा आशी आणि बॉबी यांच्या प्रेमाभोवती फिरते. स्वित्झर्लंडमध्ये झालेली त्यांची भेट, प्रेम आणि कौटुंबिक अडचणी यांमुळे कथेला वेगळे वळण येते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us