ऐश्वर्या रायचा तो चित्रपट; विना मेकअप लूकमुळे सगळेच थक्क, थेट ठरला ब्लॉकबस्टर!

90च्या दशकात प्रदर्शित झालेल्या एका चित्रपटाने सर्वत्र खळबळ माजली होती. या चित्रपटात दिग्दर्शकाने ऐश्वर्या रायला विना मेकअप दाखवण्याचा आग्रह धरला होता. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अनेकांच्या मनावर राज्य केले.

| Updated on: Apr 28, 2026 | 6:58 PM
1 / 6
९० च्या दशकाच्या अखेरीस एक असा चित्रपट आला, ज्यामध्ये ऐश्वर्या राय बच्चनचे सौंदर्य पाहण्यासारखे होते. तिच्या सौंदर्यावर अनेकजण फिदा झाले होते. तिचे नैसर्गिक सौंदर्या (Natural Grace) सर्वात मोठे आकर्षण ठरले. कोणताही जड मेकअप नाही, कोणताही ग्लॅमरस ओव्हरडोज नाही - केवळ साधेपणा आणि निरागसतेच्या जोरावर तिने पडद्यावर अशी जादू केली की प्रेक्षक थक्क झाले. तिचे मोठे डोळे, सहज हास्य आणि स्क्रीन प्रेझेन्सने प्रत्येक सीन जिवंत केला. याच कारणामुळे चित्रपट प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिसवर गाजला आणि लोकांच्या मनात घर करून गेला. विशेष म्हणजे, ज्या साधेपणाबद्दल सुरुवातीला शंका होती, तीच चित्रपटाची सर्वात मोठी ताकद ठरली. स्वतः दिग्दर्शकही या अफाट यशामुळे आणि प्रेक्षकांच्या प्रतिसादामुळे थक्क झाले होते.

2 / 6
१९९९ हे वर्ष हिंदी चित्रपटसृष्टीसाठी अनेक अर्थांनी संस्मरणीय ठरले, परंतु १३ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झालेल्या एका चित्रपटाने इतिहास रचला. तो चित्रपट होता 'ताल'. सुभाष घई यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या संगीतमय कलाकृतीने केवळ देशातच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही प्रचंड यश मिळवले. 'ताल' या म्युझिकल रोमँटिक ड्रामा चित्रपटाने परदेशातही खळबळ उडवून दिली. चित्रपटाने संगीताच्या माध्यमातून कथा सांगण्याची एक नवीन पद्धत दाखवून दिली आणि बॉलिवूडच्या 'म्युझिकल जॉनर'ला एका नवीन उंचीवर नेले. चित्रपटातील नायिका ऐश्वर्याचा नैसर्गिक लूक आणि तिचा शानदार अभिनय आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे.

3 / 6
सुभाष घई यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि निर्मिती करण्यासोबतच लेखनही केले होते. चित्रपटात ऐश्वर्या राय, अक्षय खन्ना आणि अनिल कपूर मुख्य भूमिकेत होते, तर अमरीश पुरी आणि आलोक नाथ यांनी सहाय्यक भूमिका साकारल्या होत्या. ए.आर. रहमान यांचे जबरदस्त संगीत आणि आनंद बक्षी यांचे बोल या चित्रपटाचा आत्मा ठरले. सुमारे ११ कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने जवळपास ५१.१६ कोटी रुपयांची कमाई केली, म्हणजेच आपल्या बजेटपेक्षा अनेक पटींनी जास्त नफा मिळवला. याच कारणामुळे तो त्या वर्षातील चौथा सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट ठरला.

4 / 6
'ताल' केवळ भारतातच नाही, तर परदेशातही गाजला. शिकागो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आणि ४५ व्या आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सवात (IFFI) याचे प्रदर्शन करण्यात आले. 'व्हरायटी' मासिकाच्या टॉप-२० बॉक्स ऑफिस यादीत स्थान मिळवणारा हा पहिला भारतीय चित्रपट ठरला. नंतर या चित्रपटाचे तमिळमध्ये 'थालम' नावाने डबिंग करण्यात आले.

5 / 6
या चित्रपटात ऐश्वर्याने मेकअप केला नव्हता. सुभाष घई यांना त्यांच्या नायिका नेहमीच 'मिनिमल मेकअप'मध्ये आवडतात, कारण त्यामुळे खऱ्या भावना अधिक चांगल्या प्रकारे उमटतात. 'ताल'मध्ये त्यांनी ऐश्वर्या रायला विना मेकअप दाखवण्याचा निर्णय घेतला. एका मुलाखतीत त्यांनी सांगितले होते की, "जेव्हा मी ऐश्वर्याला ही भूमिका दिली, तेव्हा मला एक साधी आणि दिव्य मुलगी दाखवायची होती जी नैसर्गिकरित्या सुंदर असेल." त्यांनी मेकअप आर्टिस्ट मिकी कॉन्ट्रॅक्टर यांना स्पष्ट सूचना दिल्या होत्या की, "मी तुला हवे तितके पैसे देईन, पण ऐश्वर्यावर मेकअप लावू नकोस." मिकी यांनी हे एक आव्हान मानले होते, कारण विना मेकअप कॅमेऱ्यासमोर परफेक्ट लूक राखणे सोपे नव्हते.

6 / 6
चित्रपटात ऐश्वर्याने पहिल्यांदा मेकअप केवळ 'कहीं आग लगे लग जाए' या गाण्याच्या शूटिंगवेळी केला होता. उर्वरित चित्रपटात तिचे नैसर्गिक सौंदर्य आणि साधेपणाच पडद्यावर दिसला. हा लूक प्रेक्षकांना खूप आवडला आणि ऐश्वर्याच्या अभिनय क्षमतेला एक नवीन ओळख मिळाली. ए.आर. रहमान यांचे संगीत चित्रपटाची सर्वात मोठी ताकद होते. 'रामता जोगी', 'इश्क बिना', 'ताल से ताल मिला' ही गाणी आजही तितकीच लोकप्रिय आहेत.

Follow Us