
बॉलिवूडचा सुपरस्टार अजय देवगणने आपल्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट दिले आहेत. या चित्रपटांमध्ये त्याच्या दृश्यम सिनेमाला जितकं प्रेम मिळालं, तितकं प्रेम दुसऱ्या कुठल्या चित्रपटाला मिळालं नाही. हा त्याचा सर्वात डिसेंट आणि सुपरहिट चित्रपट आहे. या फिल्मची कास्ट सुद्दा खूप लोकप्रिय झालेली.

अजय देवगणच्या या चित्रपटात त्याच्या पत्नीचा रोल श्रिया सरनने केला होता. मोठ्या मुलीचा रोल तनुश्री दत्ताची छोटी बहिण इशिता दत्ताने केलेला. फिल्ममध्ये अजय देवगणची अजून एक लहान मुलगी दाखवली आहे. तो रोल मृणाल जाधवने प्ले केलेला. तिने तिच्या निरागसतेने सर्वांच मन जिंकलेलं.

दृश्यम फिल्मबद्दल बोलायच झाल्यास हा चित्रपट 2015 साली आला. यात मृणाल जाधवने अनू साळगावकरचा रोल प्ले केलेला. चित्रपटात तिने पोलीस चौकशीच्या सीनमध्ये कमालीची अभिनय करुन सर्वांच मनोरंजन केलेलं.

मृणाल जाधवबद्दल बोलायच झाल्यास अभिनेत्रीचा जन्म 26 नोव्हेंबर 2008 रोजी झाला. आता ती 17 वर्षांची आहे. काही प्रोजेक्ट्सचा भाग आहे. तिने आपल्या करिअरमध्ये दृश्यम, दृश्यम 2, भयभीत आणि तू ही रे सारख्या प्रोजेक्ट्समध्ये काम केलय.

मृणाल लाइमलाइटपासून दूर असते. पण अभिनेत्री इंस्टाग्रामवर खूप Active आहे. इंस्टावर तिचे 5000 पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. ती आपले फोटोज या प्लॅटफॉर्मवर शेअर करते. मृणालला छोट्या वयातच अनेक पुरस्कार मिळाले आहेत. ती आत मोठी झाली असली, तरी चेहऱ्यावरील निरागसता अजूनही कायम आहे.