या गाण्याशिवाय कधीच पूर्ण होत नाही पार्टी, हिमेश रेशमियाचं हे गाणं ऐकताच उठून नाचू लागतात लोक

प्रत्येक पार्टीमध्ये वाजवलं जाणार हिमेश रेशमियाचं सर्वात सुपरहिट गाणं. प्रत्येक शब्द आणि स्टेप प्रेक्षकांना लावतात वेड. आजही वाजताच उठून नाचायला लागतात लोक.

| Updated on: May 14, 2026 | 12:32 PM
1 / 5
बॉलिवूडमध्ये अनेक गाणी येतात आणि जातात, पण काही गाणी अशी असतात जी रिलीज झाल्यानंतर थेट लोकांच्या मनात घर करतात. असच एक सुपरहिट पार्टीमध्ये प्रचंड लोकप्रिय गाणं म्हणजे ‘हुक्का बार’.

2 / 5
Khiladi 786 या चित्रपटातील हे गाणे रिलीज होताच देशभरात प्रचंड लोकप्रिय झाले होते. क्लब, पार्टी, कॉलेज फेस्ट, डीजे नाइट आणि लग्नसमारंभ अशा प्रत्येक ठिकाणी हे गाणे मोठ्या आवाजात वाजताना ऐकायला मिळत होते.

3 / 5
या गाण्यात अक्षय कुमार आणि असिन यांची भन्नाट केमिस्ट्री पाहायला मिळाली होती. अक्षय कुमारचा नेहमीप्रमाणे मजेशीर आणि स्टायलिश अंदाज या गाण्यातही प्रेक्षकांना खूप आवडला. त्याचा ‘खिलाडी’ स्टाईल स्वॅग आणि दमदार डान्स मूव्ह्ज यामुळे गाण्याची लोकप्रियता आणखी वाढली.

4 / 5
‘हुक्का बार’ या गाण्याला प्रसिद्ध गायक आणि संगीतकार हिमेश रेशमियाने संगीत दिले होते. हिमेशच्या वेगळ्या आवाजाची शैली आणि गाण्यातील भन्नाट बीट्स यामुळे हे गाणे तरुणाईमध्ये जबरदस्त हिट ठरले. गाण्याचे बोल काहीसे हटके आणि मजेशीर वाटत असले तरी त्याची धून इतकी आकर्षक होती की लोकांना हे गाणे पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटत होते.

5 / 5
विशेष म्हणजे या गाण्यातील ‘हुक स्टेप’ त्या काळात मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. अनेक तरुण सोशल मीडियावर आणि स्टेज शोमध्ये हा डान्स स्टेप करताना दिसत होते. कॉलेज फेस्टमध्ये तर हे गाणे लागले की संपूर्ण वातावरण उत्साहाने भरून जात असे. डीजे नाइटमध्येही ‘हुक्का बार’ शिवाय पार्टी अपूर्ण वाटत होती.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us