
परिणीती चोप्रा हिचे लग्न अत्यंत शाही पद्धतीने उदयपूर येथे पार पडले. परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा हे लग्नात धमाल करताना दिसले. यांच्या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहेत.

अक्षय कुमार हा परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या लग्नाला उपस्थित राहू शकला नाहीये. मात्र, परिणीती चोप्रा हिला लग्नानंतर मोठे गिफ्ट देताना अक्षय कुमार दिसतोय.

अक्षय कुमार याने सोशल मीडियावर खास फोटो शेअर केलाय. हा फोटो त्यांचा आगामी चित्रपट मिशन रानीगंजमधील आहे. या फोटोमध्ये परिणीती चोप्रा ही साडीमध्ये जबरदस्त लूकमध्ये दिसतंय.

हा फोटो शेअर करत अक्षय कुमार याने परिणीती हिला गिफ्ट देण्याबद्दल लिहिले. अक्षयने लिहिले की, प्रेमापेक्षा मौल्यवान काहीही नाहीये. परिणीती चोप्रा तुझ्या खास दिवसासाठी एक गिफ्ट, जे उद्या येत आहे....

अक्षय कुमार याच्या या पोस्टवर परिणीती चोप्रा हिने हार्ट इमोजी शेअर केले. आता अक्षय कुमार याची ही पोस्ट तूफान व्हायरल होताना दिसतंय. लोक यावर कमेंट करत आहेत.